ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष हे दोन मोठे पक्ष आहेत. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते . हुजूर पक्षाचे नेतृत्व हे ऋषी सनक आणि मजूर पक्षाचे नेतृत्व स्टार्मर यांच्याकडे आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तांतर घडून आलं आहे.
झालेल्या निवडणुकीत मजूर पक्षाने मोठी बाजी मारली आहे. तब्बल १४ वर्षापासून सत्तेत असलेल्या हुजूर पक्षाचा मजूर पक्षाने पराभव केला आहे. यावर “मी नुकसानाची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि ब्रिटीश लोकांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश समजतो असं हुजूर पक्षाचे पंतप्रधान ऋषी सनक म्हणाले.