मुंबई :- राज्यभरात ईडीने केलेल्या कारवाईत 70 मालमत्ता जप्त केल्या आहेत. 13 ऑक्टोबर रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.
जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे.
ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत.
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. ED ने जळगाव, नाशिक आणि ठाणे येथील राजमल लखीचंद समूहाच्या 13 ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले.