अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन्स; आणखी १५ ते २० सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर
अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन्स; आणखी १५ ते २० सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर
img
दैनिक भ्रमर

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकार आणि गायक ईडीच्या रडारवर आहेत. बेटिंग ॲपचं प्रमोशन केल्यामुळे रणबीरला हे समन्स पाठवण्यात आलं आहे.

महादेव गेमिंग-बेटिंग हा ऑनलाइन सट्टेबाजी करण्याचा अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याचं लग्न फेब्रुवारीमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालं होतं. या लग्नात तब्बल २०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडीओ भारतीय तपासयंत्रणांच्या हाती लागला. त्याच्या लग्नात सहभागी झालेल्या सगळे सेलिब्रिटी तपासयंत्रणांच्या रडारवर आले आहेत.


एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने समन्स बजावले आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपप्रकरणी ईडीकडून रणबीर कपूरला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महादेव बेटिंग अ‍ॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकरच्या लग्नात आणि सक्सेस पार्टीला कोणाची उपस्थिती होती याचाही तपास ईडीकडून सुरू आहे. रणबीर कपूरशिवाय किमान १५ ते २० सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये भारती सिंह, सनी लिओनी, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान,  नुसरत भरूचा, कृष्णा अभिषेक, अली अजगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, ऍली अवराम, भाग्यश्री, पुलकित- क्रिर्ती यांचा समावेश आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group