वसई विरारचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावरील ED कारवाई प्रकरण ताजे असतानाच आणखी एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. आचोळे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा...
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, तपासाअंती रेड्डी यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. याअंतर्गत ED (अंमलबजावणी संचालनालय) ने यापूर्वी वसईतील तसेच हैदराबाद येथील निवासस्थानी छापे टाकून तब्बल 23 कोटी 25 लाख 40 हजार रुपयांचे हिरे-जडजवाहीर आणि 8 कोटी 32 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली होती.त्यांच्याकडे आढळलेली संपत्ती ही त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अत्यंत जास्त असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.