राजकीय वर्तुळात खळबळ, बड्या नेत्याच्या घरावर ईडीचे छापे
राजकीय वर्तुळात खळबळ, बड्या नेत्याच्या घरावर ईडीचे छापे
img
Dipali Ghadwaje
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानावर ‘ईडी’ने छापेमारी केली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी बांदल यांच्या निवासस्थानावर छापे मारले.

कारवाईच्यावेळी मंगलदास बांदल हे आपल्या मोहम्मद वाडी पुणे येथील निवासस्थानी होते. तर शिक्रापूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल तसेच बांदल यांचे भाऊ आहेत.

 ‘मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली असून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. बांदल यांच्याशी संबंधित बँकेची लॉकरही अधिकाऱ्यांनी तपासून पाहिलं आहे.

बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक प्रकरणातील आरोपी आहेत. बराच काळ ते तुरुंगात होते, सध्या जामिनावर बाहेर आहेत. ईडीची ही दुसरी कारवाई बांदल यांच्यावर होत आहे.

शिरूर-हवेली विधानसभा लढवण्यासाठी सध्या ते इच्छुक आहे. लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र बांदल यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group