माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
img
Dipali Ghadwaje
CBI ने गुरुवारी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापा टाकला आहे. जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. याशिवाय केंद्रीय एजन्सीने जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले आहेत.

सीबीआयच्या धाडीनंतर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, मागील ३-४ दिवसांपासून मी आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असा परिस्थितीत सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात आहेत.  

माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.
 
काय आहे प्रकरण?
किरु हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाचे 2019 मध्ये सुमारे 2,200 कोटींना एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा संशय सीबीआयला आहे. या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी सीबीआयने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group