ऐन लोकसभा निवडणुकीत ओबीसी प्रमाणपत्रावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. 2010 नंतरची सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे तब्बल ५ लाख लोकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधीक माहिती अशी की , पश्चिम बंगाल हायकोर्टाने 2 दिवसांपूर्वी 2010 नंतर दिलेली OBC प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला होता. 2011 नंतर कुठलाही नियम न पाळता ही प्रमाणपत्र दिली गेली असा न्यायालयाने ठपका ठेवला आहे.
मात्र तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी कोर्टाचा हा निकाल अमान्य असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर जेंव्हा सुप्रीम कोर्ट सुरू होईल तेंव्हा कोर्टात जाणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.