मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवारी निधन झालं. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना नुकतेच एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
सिताराम येच्युरी यांचा मूळचा जन्म मद्रासमधील आहे. आयुष्यभर त्यांनी कम्युनिष्ट पक्षाचं काम जोमाने केलं. विशेष म्हणजे भारतात कम्युनिष्ट पक्षाच्या वाढीचा आणि पक्षाला उतरती कळा लागण्याचा काळही येच्युरी यांनी पाहिलेला आहे. सध्याच्या काळाच्या त्यांनी केरळमधील सरकारमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती. सिताराम येच्युरी यांच्या जाण्याने कम्युनिष्ट पक्षाने बुद्धीवादी चेहरा गमावलाय.