६ ऑगस्ट २०२४
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना वृद्धापकाळाशी संबंधित
आजारामुळे आज रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिनसह विविध तज्ञांकडून त्यांची तपासणी केली जात आहे.
अपोलो हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ञांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.
Copyright ©2026 Bhramar