काही महिन्यांपूर्वी मनोहर धाकड या राजकीय नेत्याचा हायवेवरील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशमधून देखील एका भाजप नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती आहे. तृणमूल काँग्रेस नेता आणि भाजप महिला नेता रात्रीच्या वेळीस एकाच कारमध्ये होते. कार जंगलाच्या मधोमध उभी असून, स्थानिक रहिवाशांनी दोघांना एकत्र पाहताच खळबळ उडाली. एकानं या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल केला आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला नेत्या भाजपच्या दीपा बनिक अधिकारी आहेत, तर पुरुष नेते तृणमूल काँग्रेसचे पंचायती समितीचे अध्यक्ष पंचानन रॉय आहेत. व्हिडिओमध्ये तिसरा एक चालकही दिसत आहे. ही घटना अपलचंद जंगलातून उघडकीस आली. गावकऱ्यांनी तिघांना कारमध्ये दारू पार्टी करताना पकडले. तसेच व्हिडिओही शूट केला.
बराच काळ एकाच ठिकाणी कार उभी असल्याकारणाने स्थानिकांना संशय आला होता. त्यानंतर काही लोक कार जवळ पोहोचले. नंतर आत बसलेल्या लोकांना बाहेर येण्यास सांगितले. यावेळी दोन्ही नेते दारू पार्टी करत असल्याचं समोर आलं. जेव्हा दोघांना पाहिलं, तेव्हा गावकऱ्यांना धक्का बसला. एक भाजप महिला नेता तर, दुसरे तृणमूल काँग्रेसचे नेते होते. गावकऱ्यांनी पाहताच दीपा यांनी हातात असलेला दारूचा ग्लास पुढच्या सीटकडे सरकवला. दोन्ही नेते एकाच कारमध्ये असल्याचं कळताच इतर गावकऱ्यांनी कारभोवती घेराव घातला.
तसेच व्हिडिओही शूट केला आणि व्हायरल केला. या प्रकारावर दीपा म्हणातात, 'मला अडकवण्यासाठी सापळा रचण्यात येत आहे. हा राजकीय कट आहे', असं त्या म्हणाल्या. दरम्यान, टीएमसीने यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सध्या दोन्ही नेत्यांचा दारू पार्टीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.