सरकारची तिजोरी पान मसाला भरणार, तब्बल 'इतक्या' हजार कोटींचे टार्गेट
सरकारची तिजोरी पान मसाला भरणार, तब्बल 'इतक्या' हजार कोटींचे टार्गेट
img
वैष्णवी सांगळे
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांवरील उत्पादन शुल्क आणि कर रचनेत मोठी वाढ करण्यात आली आहे.अनेकांकडून या निर्णयाचे कौतुक होत आहे कारण तंबाखूजन्य उत्पादनांवरील उत्पादन शुल्क आणि कर रचनेत वाढ केल्यामुळे या उत्पादनांचा वापर कमी होईल आणि यामुळे या उत्पादनांचा वापर करणाऱ्यांची संख्याही कमी होईल.असे बोलले जात आहे. मात्र या वाढलेल्या करामुळे सरकारची तिजोरी मात्र भरणार आहे. 

आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पान मसाला उत्पादनावर आकारण्यात आलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून सरकारला 14,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पान मसाल्यावर 1 फेब्रुवारीपासून आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू करण्यात आला आहे, जो 40 टक्के GST व्यतिरिक्त आहे. पान मसाला उत्पादन युनिटच्या उत्पादन क्षमतेच्या आधारे या उपकराची गणना केली जाईल. 

40 टक्के GST लावल्यानंतर पान मसाल्यावरील एकूण कराचा बोजा 88 टक्के राहील. अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांनुसार, सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन महिन्यांत (फेब्रुवारी आणि मार्च) आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून 2,330 कोटी रुपये आणि 2026-27 मध्ये 14,000 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group