महत्वाची बातमी : ३१ मार्चच्या आधी करा 'हे' महत्त्वाचे काम , अन्यथा भरावा लागेल अतिरिक्त टॅक्स
महत्वाची बातमी : ३१ मार्चच्या आधी करा 'हे' महत्त्वाचे काम , अन्यथा भरावा लागेल अतिरिक्त टॅक्स
img
Dipali Ghadwaje
टॅक्स संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे.  नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन आर्थिक वर्षात पैशासंबंधित अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल टॅक्समध्ये होणार आहे.

१ एप्रिलपासून आयटीआर फाइल करण्यास सुरुवात होईल. २०२५-२६ साठी आयटीआर फाइल करण्याची सुरुवात एप्रिल महिन्यापासून होणार आहे. परंतु आयटीआर भरण्याआधी काही कामे करणे खूप गरजेचे आहे.

टॅक्स वाचवण्यासाठी या ठिकाणी करा गुंतवणूक 

जर तुम्ही जुनी कर प्रणाली निवडली असेल तर आयकर कलम 80C,80D,80G अंतर्गत तुम्ही टॅक्स सेव्हिंगचा फायदा घेऊ शकतात. 

80C अंतर्गत पीपीएफ,ELSS म्युच्युअल फंड, लाइफ इन्श्युरन्स, होम लोन, ५ वर्षांची एफडी यामधील गुंतवणूकीवर १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्सपासून सूट मिळणार आहे.

80D अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर २५००० पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट देण्यात आली आहे. 80G अंतर्गत चॅरिटीसाठी दिलेल्या डोनेशनवर टॅक्स सूट मिळते. 

80CCD (1B) अंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीममध्ये ५०,००० पर्यंत सूट मिळते.

टॅक्स डिडक्शनचा प्रुफ 

जर तुम्ही कर्मचारी आहात तर तुम्हाला 80C, 80D अंतर्गत होम लोनच्या व्याजचा प्रुफ द्यावा लागणार आहे. ३१ मार्चपर्यंत हा प्रुफ तुम्हाला द्यायचा आहे. 

TDS/TAX अॅडजस्ट करा 

जर तुमच्या इन्कम आणि डिडक्शनमध्ये काही बदल असतील तर एम्प्लॉयर किंवा TDS कपात करणाऱ्या संस्थेला याबाबत लगेच माहिती द्या.

अॅडव्हान्स टॅक्स भरा

जर तुमची लायबलिटी १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे तर ३१ मार्चपूर्वी  अॅडव्हान्स टॅक्स भरा. जर असे केले नाही तर तुम्हाला व्याज द्यावे लागेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group