आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला. या छाप्यात कंपनीच्या अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांनी धाड टाकली ज्यात मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे.
आयकर विभागानं ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर केलेल्या छापेमारीमुळे. या छापेमारीत कंपनीशी संबंधित परिसरातून आयकर विभागानं नोटांचे मोठाले बंडल जप्त केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या छापेमारीत आयकर विभागानं जप्त केलेली रोकड इतकी आहे की, मोजणी करता करता चक्क नोटा मोजण्याची मशिनच बंद पडली.
आयकर विभागानं ओडिशातील बोलंगीर, संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा येथील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही छापेमारी अजुनही सुरूच असल्याचं समजतंय तर बुधवारपर्यंत या छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या रक्कमेपैकी तब्बल 50 कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली होती, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर नोटा शिल्लक होत्या. नोटांची संख्या इतकी जास्त होती की, नोटा मोजण्यासाठी आणलेल्या मशीनही थकल्या आणि त्या बंद पडल्या.
बुधवारी सकाळपर्यंत आयकर विभागाच्या पथकानं 50 कोटी रुपये जप्त करून त्यांची मोजणी केली. यावरुनच आयकर विभागाच्या छापेमारीत किती मोठी रोकड सापडली आहे याचा अंदाज येऊ शकतो.
महत्त्वाची बाब म्हणजे, अद्याप छापेमारी संपलेली नाही. अजुनही छापेमारी सुरू असून आयकर विभागाचे लोक अजूनही बौद्ध डिस्टिलरीजच्या आवारात उपस्थित आहेत आणि कारवाई सुरू आहे.