क्षुल्लक कारणातून माथेफिरू तरुणाने आईला जिवंत जाळलं , कारण हेच की..
क्षुल्लक कारणातून माथेफिरू तरुणाने आईला जिवंत जाळलं , कारण हेच की..
img
वैष्णवी सांगळे
एका माथेफिरू तरुणाने स्वतःच्याच आईला जिवंत जाळल्याची संतापजनक घटना ओडिशा येथे घडली आहे. ओडीशाच्या भद्रक जिल्ह्यातील तिहिडी पोलीस स्टेशन परिसरात वृद्ध आईला जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आईनं दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तरूणाला संताप अनावर झाला. आणि त्यानं आईला जिवंत जाळलं. गंभीर दुखापतींमुळे महिला जमिनीवर कोसळली. तिच्या शरीराचा बराचसा भाग भाजला असून, तिच्यावर उपचार सुरू आहे. देबाशिष नायक (वय वर्ष ४५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. तो गलगंडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, देबाशिषने वृद्ध आईकडे दारू खरेदी करण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, आई ज्योत्सनारानी नायक (वय वर्ष ६५) यांनी पैसे देण्यास थेट नकार दिला. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याची भांडणं झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलानं संतापून आईवर हल्ला केला. 

गंभीर दुखापतींमुळे महिला बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. आई जमिनीवर पडल्यानंतर आरोपीनं त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच पेटवून दिले. महिला शुद्धीवर येण्यापूर्वीच देबाशिषने त्यांना जाळून टाकले. महिलेनं आरडाओरड केल्यानंतर मुलाने तिथून पळ काढला.  शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी सांगितले की, महिलेचा बराचसा भाग जळाला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देबाशिषला ड्रग्जचे व्यसन आहे. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 
odisha |
इतर बातम्या
Join Whatsapp Group