मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसला आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचे वातावरण आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो. याशिवाय, पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या 10 जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर 31 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.