दरदिवशी वेगवेगळे गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येत असतात दरम्म्यान, तरुणाच्या जाचाला कंटाळून १७ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय. जटवाडा रोडवर असलेल्या ओव्हार गावात तरुणी राहत होती. तिला कासिम यासीन पठाण नावाचा तरुण सतत त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उछललं आहे. या प्रकरणी तरुणाला अटक करावी अशी मागणी तरुणीच्या कुटुंबियांनी केलीय.
याबाबत मिळालेली माहिती असी की, १७ वर्षांची तरुणी ओव्हर गावात राहत होती. तिला कासिम यासीन पठाण हा त्रास देत होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचंही समोर येत आहे. त्याने तरुणीला ब्लॅकमेल केलं होतं. तुझ्या भावाला संपवून टाकू अशा धमक्या तो देत होता. शेवटी तरुणाच्या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
तरुणीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुबिंयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या नातेवाईकांनी या प्रकरणात संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. तर माजी उपमहापौर विजय औताडे यांनीही या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी असं म्हणत आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.