प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयातत दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीचं सातत्याने निरीक्षण करत आहे. मात्र याबाबत धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी किंवा रुग्णालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.