फिरता पंखा हातानं थांबवून सोशल मीडियात ट्रेंड करणारे , 'लड्डू मुत्या बाबा' आहे तरी कोण?
फिरता पंखा हातानं थांबवून सोशल मीडियात ट्रेंड करणारे , 'लड्डू मुत्या बाबा' आहे तरी कोण?
img
Dipali Ghadwaje
सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मिडीयावर सध्या असे अनेक रिल्स तुम्ही पाहिले असतील.  धावता पंखा हातानं थांबवत पंख्याच्या वरची धूळ कपाळी लावणारा 'फॅनबाबा'  चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे.  हा फॅनवाला लड्डू मुत्या बाबा कोण आहे?  याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

आता दोन तीन जणांच्या खांद्यावर बसत हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्डू मूत्या बाबांच्या  व्हिडिओसारखे अनेकांनी रिल्स, व्हिडीओ बनवले असून नेटक्ऱीच लड्डू मूत्या बाबांसारखी पंखा थांबवून धूळ लावण्याची नक्कल करू लागले आहेत.

कोण आहेत लड्डू मूत्या बाबा?

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या बाबा सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालेत. सोशल मिडीयावर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. एकीकडे हा फॅन थांबवण्याचा चमत्कारिक प्रकार पाहण्यासाठी आणि लड्डू मुत्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. हे लड्डू मुत्या बाबा लोकांना प्रवचनही देतात असे सांगण्यात येत आहे. अनेक लोक त्यांना पंखेवाले बाबा म्हणूनही ओळखतात. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाविकाच्या घरातील जोरात सुरु असलेला फॅन हाताने थांबवून भाविकाला आशीर्वाद दिला होता. त्यानंतर या बाबाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.

नेटकऱ्यांनी बनवल्या मजेशीर रील्स 

सध्या सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी लड्डू मुत्या बाबाला चांगलच उचलून घेतलंय. हे बाबा म्हणे फिरता पंखा हाताने थांबवून पंख्याची धूळ आशीर्वाद म्हणून भक्तांना लावतात. मागे लड्डू मूत्या बाबांच्या स्तूतीचं गाणं सुरु असतं. या बाबाच्या चमत्कारिक व लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर रिल्स बनवून खळखळून हसवले आहे. हे मीम्स पटापट सध्या शेअर केले जात  आहे. तर काहींनी या व्हिडीओज, रिल्सवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group