अनिरुद्धाचार्य यांच्यावर मीम्स आणि व्हिडिओ बनवताय ? थांबा ; न्यायालयाचा मोठा निर्णय
अनिरुद्धाचार्य यांच्यावर मीम्स आणि व्हिडिओ बनवताय ? थांबा ; न्यायालयाचा मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
प्रसिद्ध आध्यात्मिक प्रवचक अनिरुद्धाचार्य उर्फ नेटकऱ्यांचे ‘पूकी बाबा’ यांच्या हक्कांचे संरक्षण करत त्यांचे नाव, आवाज आणि प्रतिमेचा अनधिकृत वापर करण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. सोशल मीडियावरील वाढत्या मीम्स, डीपफेक आणि एआय कंटेंटच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 



न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, आवाज किंवा फोटो वापरून तयार केलेले मीम्स, व्हिडिओ किंवा एआय-आधारित डीपफेक कंटेंट तयार करणे बेकायदेशीर आहे. न्यायालयाने हेही नमूद केले की हा प्रकार केवळ ‘मस्करी’ किंवा ‘पॅरोडी’च्या मर्यादेत राहत नाही, तर तो व्यक्तीच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारा आणि बदनामी करणारा ठरू शकतो.

या प्रकरणात न्यायालयाने Meta, Google आणि X यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना संबंधित आक्षेपार्ह कंटेंट हटवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या आधीही ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान, गौतम गंभीर आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या हक्कांसाठी न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांनाही दिलासा मिळाला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group