रीलच्या नादात नको तो आगाऊपणा अंगलट आला! गळफास घेतानाचा व्हिडीओ बनवला , अन् अचानक.....; नेमकं काय घडलं?
रीलच्या नादात नको तो आगाऊपणा अंगलट आला! गळफास घेतानाचा व्हिडीओ बनवला , अन् अचानक.....; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
अहिल्यानगर : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासात अनेक तरुण-तरुणी जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील जामखेड शहरात घडली आहे.

गळफास घेतानाचा रील बनवण्याच्या नादात एक तरुण प्रत्यक्षात त्या दोराच्या फासात अडकला. दरम्यान, यावेळी रील काढणाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांना वेळीच संपर्क केल्यानं त्याचा जीव सुदैवाने वाचला असला, तरी त्याची प्रकृती गंभीर आहे.

प्रकाश भीम बुडा (वय १७) असं या युवकाचं नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. तो सध्या जामखेड येथील एका हॉटेलमध्ये काम करत आहे.

सोशल मीडियावर रील व्हायरल करण्याच्या उद्देशाने त्याने गळफास घेण्याचा बनाव करत स्वतःचं चित्रीकरण सुरू केलं होतं. मात्र, दोरी गळ्याला अडकली आणि तो शुद्ध हरपून त्याला गळफास बसला.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रकाशला खाली उतरवलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group