माणुसकीला काळीमा फासणारी घटना! संतापजनक व्हिडीओ आला समोर ; नेमकं काय प्रकरण?
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! संतापजनक व्हिडीओ आला समोर ; नेमकं काय प्रकरण?
img
DB
मुंबई : वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील शवागृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2 हजार रुपये लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपूर येथील असून, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई-वडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता, शवागृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 



प्रथम कर्मचाऱ्यांनी मृत तरुणीच्या वडिलांकडून 1 हजार रुपये मागितले होते. मात्र, नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2 हजारांपर्यंत वाढवली. “कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो” असे म्हणत कर्मचाऱ्यांनी थेट रोख रक्कम उकळली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालिका प्रशासनाने अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. 

 
   
इतर बातम्या
Join Whatsapp Group