'तारक मेहता...' फेम 'सोढी' घरी परतला; गुरूचरण सिंग कुठे होता? स्वत:च केला खुलासा
'तारक मेहता...' फेम 'सोढी' घरी परतला; गुरूचरण सिंग कुठे होता? स्वत:च केला खुलासा
img
Dipali Ghadwaje
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह  25 दिवसांनी घरी सुखरुप परतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं. अभिनेत्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुरुचरण बेपत्ता असल्याने चाहत्यांसह पोलीसदेखील हैराण झाले होते. आपला मुलगा घरी परत यावा यासाठी त्याचे वडीलही प्रार्थना करत होते. अशातच आता 25 दिवसांनी गुरुचरण आपल्या घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान गुरुचरण म्हणाला,"दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो". 

गुरुचरण कुठे होता? 

गुरुचरण घरी परतल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीदरम्यान तो कुठे होता असा प्रश्न विचारला. त्यावेळी गुरुचरण म्हणाला,"मी दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो. अनेक दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला". गुरुचरणी पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा होता भाग

गुरुचरण सिंह 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारत होता. 2008 ते 2013 पर्यंत तो या मालिकेचा भाग होता. त्यानंतर त्याने या मालिकेला अलविदा केलं. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबत गुरुचरणचे वाद झाले होते. या मालिकेसाठी गुरुचरणला 2020 मध्ये पुन्हा काम करण्यासाठी विचारणा झाली होती. पण वडिलांकडे लक्ष देण्याचं कारण देत त्याने ही मालिका न करण्याचं कळवलं. त्यानंतर छोट्या पडद्यावरील कोणत्याही मालिकेत तो दिसला नाही. स्क्रीन पासून सध्या तो दूर आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group