७० वा राष्ट्रीय चित्रपटाच्या पुरस्कारात ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' ची  बाजी
७० वा राष्ट्रीय चित्रपटाच्या पुरस्कारात ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' ची बाजी
img
दैनिक भ्रमर
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची आज घोषणा करण्यात आली,आज, 16 ऑगस्ट रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने) नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा झाली. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘कंतारा’ या चित्रपटामधील त्याचे काम आणि कर्तृत्व पाहून त्याला हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.

तसेच , यंदा परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी भाषिक चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे. तर मागच्या वर्षात सर्वाधिक गाजलेला चित्रपट ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ नेही बाजी मारली आहे. 

आदीगुंजन या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन - सुमंत शिंदे, तसेच सर्वोत्तम माहितीपट हा हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच निर्माता आणि दिग्दर्शक - साहिल वैद्यलाही पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्तम ऐतिहासिक चित्रपट अशोक राणे दिग्दर्शित हा चित्रपट “आणखी एक मोहेंजोदडो” ठरला आहे. तर स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे आणि अनिता दाते यांच्या ‘वाळवी’ या सिनेमाला सर्वोत्तम मराठी भाषिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार ‘कंतारा’ चित्रपटाला जाहीर झाला असून त्याचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी ला ‘कंतारा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह याला ‘ब्रह्मास्त्र’ साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर याच चित्रपटासाठी संगीतकार प्रीतम यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे..

यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार यंदा विभागला गेला आहे. अभिनेत्री नित्या मेननला 2022 मधील तमिळ चित्रपट ‘थिरुचित्रंबलम’ मधील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला आहे, तर मानसी पारेख हिला गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेसमधील अभिनयासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार उंचाई या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पवन राज मल्होत्रा याने जिंकला आहे. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा ‘गुलमोहर’ ठरला आहे. यात मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group