अहमदाबाद :- येथे दोन शाळकरी मुलींनी एका मुलाला बेदम मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे. तो या मुलींची छेड काढत होता, असा आरोप केला जातोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलगी त्या तरूणाला बेल्टने मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे.
लाथाबुक्क्यांसह बेल्टने त्याला झोडत आहेत. आजुबाजूला लोकांची मोठी गर्दी जमलेली आहे, परंतु कोणीही मध्ये पडत नव्हते. काही महिला तर त्या तरुणींना मारण्यासाठी प्रोत्साहन करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे.
मारहाणीवेळी तरूण खाली पडलेला आहे. नाच्चकी होईल या भितीमुळे तो चेहरा लपवत होता. बघ्यांपैकी हा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला.
हा रोड रोमिया शाळकरी मुलींना सारखाच त्रास द्यायचा. येताना जाताना त्यांची छेड काढायचा. त्यामुळे वैतागलेल्या मुलींनी भररस्त्यातच त्याची धुलाई केली.