मोठी बातमी! गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मोठी बातमी! गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
img
DB
गुजरामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद येथील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलवरून ही धमकी दिली आहे. या ईमेलनंतर पोलीस सतर्क झाले असून शाळांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , सध्या तरी पोलीस पथकाला कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू सापडलेली नाही. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी हजर आहे. विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन अहमदाबाद प्रशासनाने केलं आहे.

घटनेबाबत सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त लवीना सिन्हा यांनी सांगितले की, "अहमदाबादमधील काही शाळांना सोमवारी ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आतापर्यंत ८ शाळांना धमकीचे मेल आले आहेत. यासंदर्भात आमच्याकडे तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. सध्या पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे".

हा धमकीचा मेल एका रशियन हँडलरकडून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गुजरातमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली जात आहे.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group