गुजरातच्या मोरबीमध्ये मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मोरबी येथे नव्याने बांधलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, त्यामुळे अनेक जण जखमी झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवलं.
दरम्यान कोसळलेल्या स्लॅब खाली काही जण अडकल्याची माहिती बचाव पथकाला मिळाली होती. त्यानंतर शोध कार्य राबवत जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवत आहे.
ही दुर्घटना बांधकाम सुरु असलेल्या मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळण्याची दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. ज्यामध्ये किमान चार कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या दुघटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा घटनास्थळावरील व्हिडीओ