अबब!  १२ अंडी ४०० रुपयांना, तर कांद्याची किंमत ऐकून डोळे पाणावतील....
अबब! १२ अंडी ४०० रुपयांना, तर कांद्याची किंमत ऐकून डोळे पाणावतील....
img
Dipali Ghadwaje
आपल्या इतिहासातील सर्वांत मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. वाढत्या महागाईने पाकिस्तान देश पूर्णतः होरपळला आहे. पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे जनता देखील त्रस्त झाली आहे.  

वाढत्या महागाईच्या पार्शवभूमीवर रिपोटर्सच्या माहितीनुसार, पंजाबची प्रांतीय राजधानी लाहोरमध्ये अंड्यांची किंमत 400 रुपये प्रति डझन झाली आहे. अंड्याचे वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. अंड्याच्या वाढत्या दरासोबतच कांद्याचे दर देखील गगनाला भिडले आहेत.

लाहोरमध्ये कांदे २५० रुपये किलो झाले आहेत. दूध २१३ रुपये लिटर, तांदूळ ३२८ रुपये किलो, सफरचंदे २३७ रुपये किलो आणि टोमॅटो २०० रुपये किलो झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात शासनाकडून अधिकृत दर यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासन त्याची योग्य अंमलबजावणी करत नसल्याने ही अडचण येत असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानात सरकारने 175 रुपये प्रति किलो कांद्याचा दर ठरवण्यात आला होता. मात्र स्थानिक प्रश्नसंचया गलथान कारभारामुळे कांद्याचे दर तब्बल 230 ते 250 प्रति किलोने विकले जात आहेत.

पाकिस्तानात केवळ अंडी आणि कांद्याचेच दर वाढले नाही (Inflation) तर यासोबतच चिकनचे भाव गगनाला भिडले असून ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रिपोर्टनुसार, लाहोरमध्ये एक किलो चिकन 615 रुपयांना मिळत आहे. याशिवाय दैनंदिन वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच वस्तूंवर सातत्याने महागाईचा फटका देशातील जनतेला बसत आहे.

यासह पाकिस्तानात दूध 213 रुपये प्रतिलिटर, तर तांदूळ 328 रुपये किलोने विकला जात आहे. फळांबद्दल बोलायचे झाले तर एक किलो सफरचंदाचा भाव 273 रुपयांवर पोहोचला आहे, तर टोमॅटो 200 रुपये किलोने विकला जात आहे. दरम्यान वाढत्या महागाईने पाकिस्तान देश पूर्णतः होरपळला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group