पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खैबर पख्तुनख्वा येथे आाज मोठा बॉम्बस्फोट झालाय. या हल्ल्यात ५ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाजौरा जिल्ह्यात पोलिओविरोधी मोहिमेसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस संरक्षण दल आपल्या वाहनातून तेथे जात होते.
यावेळी वाहनावरच हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. सदर हल्ल्यात २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सदर हल्ला नेमका कोणी केला याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.
तसेच यामध्ये कोणत्या दहशतवादी संघटनेचे नाव आहे याबाबतही माहिती समजलेली नाही. मात्र याआधी पाकिस्तानी तालिबानने पोलिओ लसीकरण मोहिमेवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा हल्ला देखील तालिबानकडून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जातेय.