बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’ सुसाट; चार दिवसांत तब्बल इतकी कमाई
बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’ सुसाट; चार दिवसांत तब्बल इतकी कमाई
img
वैष्णवी सांगळे
सध्या बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर येण्यापूर्वीच हा चित्रपट अनेक विक्रम करू शकतो अशी चर्चा होती आणि त्यानुसारच आता हा चित्रपट अनेक विक्रम मोडीत काढून नवे विक्रम रचत आहे. रणवीरच्या करिअरमधील हा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला आहे. यामध्ये त्याच्यासोबत अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत.



चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी ‘धुरंधर 2’ने रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांनाच थक्क केलं आहे.‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी ‘धुरंधर 2’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 103 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. ही गेल्या चार दिवसांतील दुसरी सर्वाधिक कमाई ठरली. यामुळे या चित्रपटाचं बॉक्स ऑफ कलेक्शन आता 450 कोटींच्या घरात पोहोचला आहे. रविवारी ‘धुरंधर 2’चे तब्बल 20,100 शोज होते.

‘धुरंधर 2’ची कमाई
पेड प्रीव्ह्यू- 43 कोटी रुपये
पहिला दिवस- 102.55 कोटी रुपये
दुसरा दिवस- 80.72 कोटी रुपये
तिसरा दिवस- 113 कोटी रुपये
चौथा दिवस- 103.45 कोटी रुपये
एकूण कमाई– 442.72 कोटी रुपये

‘धुरंधर : द रिव्हेंज’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांहून अधिक कमाई करून नवीन विक्रम रचला आहे. आजवर कोणत्याच हिंदी चित्रपटाने इतकी मोठी ओपनिंग वीकेंड कमाई केलेली नव्हती. हा एक पॅन इंडिया चित्रपट असून हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही तो प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वाधिक कमाई ही हिंदी भाषेतच झाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group