रणवीरच्या 'धुरंधर 2' ने मोडले अनेक रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी चित्रपटाची तब्बल 'इतकी' कमाई
रणवीरच्या 'धुरंधर 2' ने मोडले अनेक रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी चित्रपटाची तब्बल 'इतकी' कमाई
img
वैष्णवी सांगळे
सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर 2' सिनेमानं धुमाकूळ घातला आहे. रिलीज होऊन एक दिवस झालेल्या या सिनेमानं कोट्यवधींची कमाई आधीच केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्याचा परिणाम अॅडव्हान्स बुकिंग आणि पेड प्रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसून आला. रिलीजच्या आधीच झालेल्या पेड प्रिव्ह्यूमधून चित्रपटाने तब्बल 40 कोटींपेक्षा जास्त कमाई केली, जी बॉलिवूडसाठी एक मोठी पेड प्रिव्ह्यू कमाई आहे.

पहिल्या दिवशी सकाळपासूनच चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाला. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळपर्यंत चित्रपटाने सुमारे 70 ते 80 कोटींची कमाई केली होती आणि अखेर दिवसाअखेर हा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला. त्यामुळे ‘धुरंधर २’ने ‘जवान’सारख्या मोठ्या चित्रपटांचाही रेकॉर्ड मोडल्याची चर्चा रंगली आहे.

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय-ॲक्शन चित्रपटाला मल्टिप्लेक्स आणि ओव्हरसीज मार्केटमध्ये विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात स्क्रीन रिलीज, दमदार स्टारकास्ट आणि फ्रँचायझीमुळे चित्रपटाला ओपनिंगपासूनच फायदा झाला आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केल्यामुळे ‘धुरंधर २’ आता 500 कोटीं टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group