पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपासह राष्ट्रवादीच्या आमदारांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण
पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपासह राष्ट्रवादीच्या आमदारांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती. मात्र या बैठकीला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दांडी मारल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी सिंहस्थ आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक बोलावली होती. 

जिल्ह्यात भाजपचे देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, राहुल आहेर, दिलीप बोरसे, असे एकूण पाच आमदार आहेत. मात्र भाजपच्या आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. तसेच छगन भुजबळ आणि सुहास कांदे हेदेखील बैठकीला गैरहजर आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनंतर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समिती नेमण्यात आली आहे. तर सहअध्यक्ष म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान सिंहस्थ आढावा बैठकीला नाशिकमध्ये सुरुवात झाली असून या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नितिन पवार उपस्थित आहेत.  

यावेळी बैठकीनंतर दादा भुसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका पार पडली. 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.  याबाबत शासन निर्णय गठीत झाला आहे. नियोजनाच्या आरखाडाच्या बाबत बैठक झाली. केलेले कामकाज आणि सूचना आल्या आहेत.  सामान्य नागरिकांच्या पण सूचना घेतल्या जाणार आहेत.  त्यासाठी अ‍ॅप तयार केले जाणार आहे. इतर राज्यात कुंभमेळा झाला तेथील अनुभवाची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आराखडा तयार करण्यास मदत होईल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group