पहलगाम घटनेनंतर भारत ऍक्शन मोडवर ! घेतले ''हे'' 5 मोठे निर्णय
पहलगाम घटनेनंतर भारत ऍक्शन मोडवर ! घेतले ''हे'' 5 मोठे निर्णय
img
दैनिक भ्रमर
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काल  म्हणजेच 22 एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 28   जणांचा मृत्यू झाला आहे.या  घटनेनंतर जगभरातून संतापाची लाट उसळत आहे. दरम्यान आता या पार्श्ववभूमीवर र भारत ऍक्शन मोडवर आला असून भारताने 5 मोठे निर्णय घेतले आहे. 

दरम्यान, मोदी सरकारी कोणतं कठोर पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मोदींनी सीसीएसची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पाच कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. पाकिस्तानवर एक प्रकारे कायदेशीर स्ट्राईक भारताने केला आहे. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.

भारत सरकारचे पाच मोठे निर्णय

>> १९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे.

>> अटारी बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे. भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील तर त्यांनी १ मेपर्यंत माघारी यावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

>> पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आलेला आहे.

>> भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

>> एका आठवड्यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी देश सोडावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group