जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले आहे.जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्यामध्ये एकूण 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेदहशतवाद्यांनी प्रत्येक पर्यटकांची नावं आणि धर्म विचारला त्यानंतर गोळीबार केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि शोध मोहीम राबविली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं घेतल्याचे वृत्त आहे.
पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी हे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते आणि त्यांची संख्या ७ ते ८ असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं विचारल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला आणि गोळीबार केला.
पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी घेत टीआरएफने म्हटलंय आहे की, सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये ८५,००० बाहेरील लोकांना जागा दिली आहे. ते पर्यटक म्हणून काश्मीरमध्ये येतात पण इथंच स्थायिक होतात. हा हल्ला त्याचाच परिणाम आहे.