मोठी बातमी ! जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सरकारने घेतला ''हा'' मोठा निर्णय
मोठी बातमी ! जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सरकारने घेतला ''हा'' मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
जम्मू काश्मीर मधील पहलगाम  येथे काल (मंगळवार,  २२ एप्रिल )रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान आता पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय घेतला आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. असे असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला सरकारने 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

सरकारने नेमकी काय घोषणा केली?
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. या दहशतवाद्यांचे स्केचही जारी करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर आता पहलगाममध्ये सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. पहलगामधील घनदाट जंगलांत हा शोध चालू आहे. पुढचे काही दिवस ही शोधमोहीम चालूच राहणार आहे. या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group