उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार सध्या पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी चांगलेच चर्चेत आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने १८०० रुपये बाजारभाव असलेली जमीन ३०० कोटींमध्ये खरेदी केली असून या जमिनीच्या खरेदी व्यवहारात स्टँप ड्युटी म्हणून फक्त ५०० रुपये भरले असा आरोप केला जात आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात सहभाग असतानाही प्रशासनाकडून पार्थ पवारांविरोधात तक्रार का नाही? असे विविध प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.

शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारु तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रकरणात सहभाग असतानाही प्रशासनाकडून पार्थ पवारांविरोधात तक्रार का नाही?. कंपनीने ६ कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही अशी पोलिसांची माहिती आहे. शीतल तेजवानी यांच्याकडे संबंधित जागेची पावर ऑफ अॅटर्नी आहे. जमीन खरेदीखत शीतल तेजवानीने लिहून दिलंय तर अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांनी ते लिहून घेतलं. उपनिबंधक रवींद्र तारु यांनी कागदपत्र तयार करुन दिली.
दस्त नोदंणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन जणांवर गुन्हा दाखल झालाय. पार्थ पवारांच्या चौकशीनतंर सगळया गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. तक्रारीत पार्थ पवार यांचं नाव का नाही ? त्यावर अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘आमच्या दस्तावर ज्या पार्टी आहेत, ज्यांची नावं टाकून सह्या आहेत, त्यांच्याविरुद्ध तक्रार केलीय’,
या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र अडचणीत आलेल्या जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र, पार्थ पवार यांच्याविरोधात अजून गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीनचीट दिली जातेय का? असा प्रश्न विचारला जातोय.