स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे राज्यात जोरदार वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता या निवडणुका दिवाळीनंतर लागणार असल्याचे सांगितले जात असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका पुन्हा लांबणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी सांगितले की, 'काही निवडणूका जानेवारी महिन्यात जातील. कदाचित याचा अधिकार निवडणूक आयोगाला असणार आहे. जिल्हा परिषद निवडणुका होऊन जानेवारीत नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे.' तसंच, 'याचा फायदा तुम्हाला निवडणुकीत होईल. त्यामुळे चांगलं काम करा.
आधीच निवडणूका होण्याची गरज होती. मात्र निवडणूका का लांबल्यात हे तुम्हाला माहिती आहे. कोर्टात हे सर्व सुरु होते. महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्याचा पंचायतराजमध्ये पहिला नंबर आणा.', असे आवाहन अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.