मनोज जरांगेंची तब्येत अचानक खालावली, अंतरवाली सराटीत उपचार सुरु ; डॉक्टरांकडून मोठी अपडेट...
मनोज जरांगेंची तब्येत अचानक खालावली, अंतरवाली सराटीत उपचार सुरु ; डॉक्टरांकडून मोठी अपडेट...
img
DB
अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यांना चक्कर आली. बीपी लो झाल्यानं त्यांंना चक्कर आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. बीपी लो झाल्यानं मनोज जरांगे पाटील यांच्यावर स्टेजवरच सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक खालावली आहे. आज जरांगे पाटलांचा वाढदिवस असल्यानं मराठा आंदोलकांनी त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी केली.

मात्र अचानक त्यांना चक्कर आली आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर डाॅक्टरांच्या पथकांनी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group