दैनिक भ्रमर : पाथर्डी परिसरातील दाढेगाव येथील वालदेवी नदीवरील पूल पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे. या मार्गावरून गावकरी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग दररोज प्रवास करत असतात. परंतु हा पूल धोकादायक असून या ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिकच्या संसरी गावातील दोन तरुण पाथर्डीकडे जात होते. संजय बारकू गोडसे (वय १३) हा दुचाकीवरुन पुल पार करत असताना पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे पुलावरुन घसरला आणि नदीत वाहून जात होता यावेळी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी त्याला पाहिले. त्यावेळी गावातील बापू जाधव आणि राजाराम पवार यांनी पाण्यात उड्या मारत गोडसे याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
हे ही वाचा...
तर दुसऱ्या तरुणास ग्रामस्थांनी दोर टाकून चार-पाच जणांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना तातडीने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे हा पूल किती जास्त धोकादायक आहे हे पुन्हा अधोरेखित झाले.