ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य
मेष - आज तुम्ही नवीन व्यवसाय किंवा व्यापार सुरू करू शकता. व्यावसायिक कामे पुढे ढकलणे टाळा. अन्यथा, यामुळे तुमच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीमध्ये तुमची काम करण्याची शैली प्रशंसनीय असेल. आपला आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. काम जास्त पडण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव राहणार आहे. आर्थिक बाबतीत वातावरण चांगले राहणार आहे.
वृषभ - आज तुमच्या हातून चांगली रचनात्मक कामे होणार आहेत. महत्वाच्या कामामध्ये सातत्य राहील. कोणत्याही कामात विलंब होत नाही. नवीन कामांना पुरेसा वेळ द्यावा. आज तुम्हाला जुन्या वादातून सुटका मिळू शकेल. यामुळे वर्षानुवर्षे चाललेला तणाव संपू शकेल. नोकरीची तुमची शोध पूर्ण होईल. बांधकामाशी संबंधित कामांमध्ये सहभागी असलेल्यांना विशेष यश मिळेल. कामाच्या विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात.
मिथुन - आज तुम्ही बुद्धिचातुर्याने काम करणार आहात. पण कामामध्ये सतर्क असता तरीसुद्धा कामात थोडे लक्ष देणे जास्त जरुरीचे आहे. शुभ ग्रह आपल्याला सहकार्य करणार आहेतच, निराश करणार नाहीत. आजचा दिवस सामान्य आनंद आणि नफ्याचा असेल. पूर्ण होणाऱ्या कामात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठेबद्दल सतर्क राहण्याची गरज असेल. राग टाळा. सर्वांशी सुसंवादी वर्तन ठेवा. सर्जनशीलतेने काम करणे फायदेशीर ठरेल.
कर्क - शुभ ग्रहाच्या भ्र्मणामुळे आपली कामे वेगवान होतील. जर आपण कलाक्षेत्र साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर मनासारख्या घटना घडतील. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात अनावश्यक वाद होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत प्रकरण खटल्याच्या टप्प्यावर पोहोचू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर शब्दांमुळे लोकांना त्रास होईल.
सिंह -आज तुम्हाला एखाद्या गंभीर समस्येपासून मुक्तता मिळू शकते. राजकारणात सहभागी असलेल्या लोकांना उच्चपदस्थ व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल. नोकरीच्या शोधात तुम्हाला घराबाहेर जावे लागू शकते.आपल्याला व्यापार व्यवसाय मध्ये यश येणार आहे. मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे. घरच्यांसाठी थोडाफार खर्च होणार आहे.
कन्या - आज नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना महत्त्वाची पदे मिळू शकतात. तुमच्या बॉसशी तुमची जवळीक वाढेल. सरकार आणि सत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल. मनोबल चांगले राहणार आहे. समोर अनेक कामे दिसणार आहेत. कामाच्या अनेक संधी समोर दिसणार आहे. पण संधीचा फायदा नीट घ्या.
तुळ - आज विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे. कामे पूर्ण करताना अडचणी समोर दिसणार आहे. जुनी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गुंतवणुक करू नका. एका वेळी अनेक खर्च समोर येणार आहेत.आज, जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. व्यवसायात प्रगती कराल आणि नफा मिळवाल. कला आणि अभिनयाच्या जगात तुमचे नाव प्रसिद्ध होईल.
वृश्चिक - आज तुम्हाला योग्य नियोजन आणि योग्य हालचाली यामुळे नवीन आशादायक चित्र समोर दिसेल. कामाला चांगली गती येणार आहे. आज व्यवसायात नवीन भागीदारी होतील. नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. मित्रांसोबत पर्यटनस्थळी सहलीला जाऊ शकता. न्यायालयीन प्रकरणांमध्ये शहाणपणाने वागा. यश मिळण्याची चिन्हे आहेत. राजकारणात लोकांना उच्चपदस्थ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल.
धनु - शुभ ग्रहांची आपल्याला साथ राहणार आहे. नियमित व्यवहार चांगले होणार आहेत. व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे गती घेणार आहे. प्रापंचिक समस्या चांगल्या तऱ्हेने सोडवाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस असेल. नवीन मित्र व्यवसायात भागीदार होतील. किराणा व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष फायदे मिळतील. तुम्ही परदेशात फिरायला जाऊ शकता.
मकर - आज तुम्ही नियोजित कामे पूर्ण करणारा आहात. प्रवासाची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे. अध्यात्मिक प्रगती होणार आहे. आज दिवसाची सुरुवात मस्त, चांगल्या बातमीने होईल. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या शहाणपणाने निर्णय घ्या. जवळच्या मित्रांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या प्रकरणातून तुमची निर्दोष मुक्तता होऊ शकते.
कुंभ- महत्त्वाचे काम करताना बारकाईने लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नीट वाचूनच सह्या करा. फसवणुकीची शक्यता आहे. योग्य व्यक्तीशी संपर्क-चर्चा करूनच महत्त्वाची कामे करा. आज चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याशी तुमची जवळीक वाढेल. तुमचे राजकीय स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल.
मीन - आज आपल्या विश्वास पात्र व योग्य व्यक्तीचा सल्ल्याचा महत्त्वाच्या कामात उपयोग करून घ्या. वादग्रस्त विषय टाळणे फार महत्त्वाचे आहे. लोकांचे योग्य संवाद साधणे हाच आपला योग्य मार्ग.आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. राजकारणात गुंतलेल्या लोकांना उच्च पद मिळू शकते. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल.