ऑगस्ट म्हणजे सणांचा महिना. त्यातच श्रावणी सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २८ जुलै रोजी श्रावण सुरु झाला होता आणि आज १८ ऑगस्ट रोजी श्रावणातला शेवटचा सोमवार आहे. श्रावण हा एकाअर्थी उत्साहाचे, चैतन्यचे प्रतीक मानला जातो. तर शेवटचा श्रावणी सोमवार तुम्हाला काय देऊन जाणार आहे का जाणून घेऊया…
मेष - मेष राशीच्या व्यक्ती आज कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला कोणाचा तरी सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल.
वृषभ - वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज नवीन कल्पनांवर काम करावे, ज्यामुळे तुमच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. तुमच्या लीडरशिपमुळे तुम्ही सहकाऱ्यांना चांगले मार्गदर्शन करू शकाल. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने, आज कोणताही मोठा त्रास होणार नाही, परंतु नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत, अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे.
मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. हातातील कामांमुळे तुमची चिंता वाढेल. बुद्धीने योग्य निर्णय घ्यावा. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अभ्यासात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नात्यात प्रेम वाढेल.
कर्क - कर्क राशीच्या लोकांना आज नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. छोट्या व्यावसायिकांना रोख रक्कमेचा तुटवडा भासेल. कुटुंबातील सदस्यांसाठी पैशांची व्यवस्था कराल. व्यवसायात जोखीम घेताना काळजीपूर्वक घ्या. कौटुंबिक जीवनात आनंद टिकून राहील. पैशाची बचत कराल. आरोग्य चांगले राहील, पण तरीही स्वतःची काळजी घ्या.
सिंह - सिंह राशीच्या व्यक्ती आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतील, तुमचे जुने कर्ज फेडले जाईल. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. आज तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात नवीन गोष्टी कराल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कुटुंबात सुरु असलेला कलह संपेल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहिल. व्यवसायात छोट्या नफ्याच्या संधी मिळतील. मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टात येतील.
कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींना आज कामाचा ताण जास्त असेल. ऑफिसमध्ये तुम्ही खूप व्यस्त राहाल. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आज मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. नवीन प्रकल्पावर काम सुरु केले तर नक्की पूर्ण होईल. शेजाराच्या वादात पडणे टाळावे. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी नवीन रिलेशनशिपची सुरुवात होऊ शकते.
तूळ - तूळ राशीच्या व्यक्तींना आज जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन संधी शोधा. तुमच्या लहान भावंडांना यश मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.आज नोकरीच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहा. तुम्ही शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यावसायिक लोकांनी पार्टनरशीपमध्ये आंधळा विश्वास ठेवू नका. हानिकारक ठरेल.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होतील.आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात वेळ काढाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. आज कामात वरिष्ठ अधिकारी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तुम्ही कामातील अडचणींवर मात कराल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. तसेच प्रवास करण्याची संधी मिळेल.
धनु - धनु राशीच्या व्यक्तींनी आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आज मित्राच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कामामुळे तणाव वाढू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही बाहेर जाऊ शकता. खूप काळापासून थांबलेली कामे आज पूर्ण होतील. अविवाहित लोकांना त्यांचा खरा जीवनसाथी भेटेल.
मकर - मकर राशीच्या लोकांना आज करिअरमध्ये यश येईल. प्रेम, करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल. कौटुंबिक जीवन शांत आणि आनंदी राहील. शैक्षणिक कामांमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. राजकीय कारकिर्दीत पुढे याल. व्यवसायासंबंधी काही नवीन योजना तुमच्या मनात येतील. वडिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासेल.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आणि वाईट असा दोन्ही असेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. काही लोक नवीन गाडी किंवा घर खरेदी करण्याचा विचार करतील. आज आई-वडिलांसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळेल. अधिकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतील. तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील.
मीन - मीन राशीच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या कामाला प्रगती मिळेल. कुटुंबातील सदस्यांसाठी पार्टीचे आयोजन केले जाईल. नोकरदार लोकांनी कोणत्याही मुद्द्यावरुन वरिष्ठांशी वाद घालू नका. ऑफिसमधील सहकारी तुम्हाला मदत करतील, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. शैक्षणिक कामांमध्ये तुमची रुची वाढेल. कामातील सर्व अडचणी दूर होतील. अविवाहित लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते.