हृदयद्रावक ! बैल धुण्यासाठी शिक्षकाची नजर चुकवून गेला अन बैल धुताना...
हृदयद्रावक ! बैल धुण्यासाठी शिक्षकाची नजर चुकवून गेला अन बैल धुताना...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालन्यातील परतुर तालुक्यातील खांडवीवाडी शिवारात बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुरज कदम असं मयत मुलाचे नाव आहे. 

देवा का रे इतकी परीक्षा ? बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

बैल धुण्यासाठी सुरजने शिक्षकांकडून सुट्टी मागितली होती, मात्र शाळा सोडून बैल धुण्यासाठी जाण्यास शिक्षकांनी परवानगी दिली नाही. मात्र मधल्या सुट्टीत शिक्षकांची नजर चुकवून सूरज घरी आला. आपल्या चुलत्यासोबत गावाजवळ असणाऱ्या खदानीवर बैल धुण्यासाठी गेला. गावातील अनेकजण यावेळी बैल धुण्यासाठी खादानीवर आले होते. मात्र सगळे बैल धुण्यात मग्न असताना पाय घसरून सूरज पाण्यात बुडाला.या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group