मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकी नंतर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या त्यांच्या गावात 4 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी त्यांच्याच गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंतरवाली सराटी परिसरातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे म्हणत तेथील ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केला आहे.
यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिका ऱ्यांकडे धा व घेत नि वेदन दि ले आहे. या नि वेदनाद्वारे मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी मध्ये उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदना वर उपसरपंच, पाच ग्रामपंचायत सदस्य आणि 70 ग्रमास्थांच्या सह्या आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात गेल्या तीन ते चार दि वसांपासून गावात सह्यांची मोहीम सुरू होती .
या निवेदनात म्हटले आहे की , आंदोलनामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जातीय तेढ निर्माण होत आहे. त्याचबरोबर जातीय
सलोखा ही बिघडत आहे. या आंदोलनामुळे येत्या काळात मोठा वाद आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासह इतर अनेक मागण्यांचे निवेदन अंतरवाली सराटीचे उपसरपंच, 5 ग्रा मपंचायत सदस्य आणि आणि 70 गावकऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आता या सर्व घडामोडींवर जिल्हाधिकारी काय निर्णय घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.