ब्रेकिंग! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
ब्रेकिंग! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
img
Dipali Ghadwaje
जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. 

आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे जालन्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. दोन दिवसांत जरांगे यांचे उपोषण सोडवा, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. जालन्यातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पाय मोर्चा काढण्यात आला आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे . काल उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली होती. त्यांनी काल रात्री सलाईन लावलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. येणाऱ्या दोन दिवसात जरांगे यांच्या मागणीवर तोडगा निघाला नाही, तर सकल मराठा समाज रस्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील आंदोलकांनी दिला  आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना ज्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या केसेस पूर्ण करण्याची कारवाई वेगात सुरू आहेत. त्यासोबत सगे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत पहिलं नोटिफीकेशन जारी केलं आहे. जरांहे यांनी देखील याचा विचार करावा, आपलं उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

राज्य सरकारने सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीचं आश्वासन दिलं आहे, म्हणून सलाईन लावलं. पण पुन्हा शब्द फिरवल्यास सलाईन काढून फेकेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. माझ्या समाजाला मोठं करण्यासाठी मंत्र्यांच्या शब्दांचा सन्मान केला आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून ८ जून पासुन पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group