Nepal Bus Accident: भुसावळवर शोककळा !  पर्यटकांची बस नदीत कोसळली, १६ जणांचा  मृत्यू
Nepal Bus Accident: भुसावळवर शोककळा ! पर्यटकांची बस नदीत कोसळली, १६ जणांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
नेपाळमध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची  दुर्दैवी घटना समोर आली आहे.  दरम्यान  यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा  मृत्यू झालाय, तर १३ जणांना वाचवण्यात यश आलेय. 10 जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. . हे प्रवासी भुसावळ आणि आसपासच्या भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.  गुरुवारी रात्री ११.३० वाजता हा अपघात झाल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. देव दर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील भाविक गेले होते. ११० जणांच्या ग्रुपने गोरखपूरवरुन तीन बस केल्या होत्या. त्यामधील एक बस मुखलिसपूरजवळ नदीत कोसळली. त्यामध्ये अनेक कुटुंब होती. आई-वडील-मुलं असे सह परिवार ते पर्यटनाला निघाले होते. त्याचवेळी काळाने घाला गेला. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक हे नेपाळमध्ये तीर्थयात्रेला गेले होते. प्रयागराज येथून तीन बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते

प्रवाशांची यादी समोर आली आहे. 

१. अनंत ओंकार इंगळे २. सीमा अनंत इंगळे ३. सुहास राणे ४. सरला राणे ५. चंदना सुहास राणे ६. सुनील जगन्नाथ धांडे ७. निलीमा सुनील धांडे ८. तुळशीराम बुधो तायडे ९. सरला तुळशीराम तायडे १०. आशा समाधान बावस्कार ११.  रेखा प्रकाश सुरवाडे १२. प्रकाश नथु सुरवाडे  १३.मंगला विलास राणे  १४. सुधाकर बळीराम जावळ १५.  रोहिणी सुधाकर जावळ १६.  विजया कडू जावळे 
17.सागर कडू जावळे 18.भारती प्रकाश जावळे 19.संदीप राजाराम सरोदे 20.पल्लवी संदीप सरोदे 21.गोकरणी संदीप सरोदे 22.हेमराज राजाराम सरोदे 23.रुपाली हेमराज सरोदे 24.अनुप हेमराज सरोदे 25.गणेश पांडुरंग भारंबे 26.सुलभा पांडुरंग भारंबे 27.मिलन गणेश भारंबे 28.परी गणेश भारंबे 29.शारदा सुनील पाटील 30.कुमुदिनी रविंद्र झांबरे 31.शारदा सुनील पाटील32. निलीमा चंद्रकांत जावळे33. ज्ञानेश्वर नामदेव बोंडे 34.आशा ज्ञानेश्वर बोंडे 35.आशा पांडुरंग पाटील 36.प्रवीण पांडुरंग पाटील 37. सरोज मनोज भिरुड 38.पंकज भागवत भगाळे 39.वर्षा पंकज भंगाळे 40.अविनाश भागवत पाटील 41.अनिता अविनाश पाटील 42. मुर्तीजा (ड्रायव्हर) रामजीत (वाहक)

गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास UP-53- FT 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळली. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडुकडे निघाली होती. बसमध्ये सर्व ४० प्रवासी महाराष्ट्रातील होते. दरम्यान, काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हेलिपॅडवरून वैद्यकीय पथकाला घेऊन नेपाळ लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टर तनहुन जिल्ह्यातील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती नेपाळ लष्कराकडून देण्यात आली आहे. नेपाळच्या स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. अपघातस्थळी बचाव पथकाचं मदतकार्य सुरु आहे. एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वात नेपाळचं सैन्य दल, सशस्त्र पोलीस दलाचे जवान घटनास्थळी आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group