छत्रपती संभाजीनगर : नायलॉन मांजावर न्यायालयाने बंदी घातली असली तरी शहरात पतंग विक्रेते छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री करत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नायलॉन मांजा विक्री करणा-यांना जरब बसावी यासाठी मांजा विक्रेत्यांवर कठाेर कारवाईस प्रारंभ केला आहे. संभाजीनगर महापालिकेच्या पथकाने मांजा विक्रेत्यांच्या दुकानावर धाड टाकत 70 हजार रुपयांचा बंदी असलेला मांजा जप्त केला आहे. तसेच विक्रेत्याचे घर आणि दुकान सील केल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे.
मकर संक्रांत निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे युवा वर्गाची पंतग उडवण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पतंगाची दुकाने लागली आहेत. तसेच मांजाचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. नायलॉन मांजा आणि चायना मांजा अशा विविध प्रकारच्या मांजामुळे राज्यभरात नेहमीच छाेट्या माेठ्या दुर्घटना घडल्याचे आपल्या कानावर पडते.
त्यामुळे या मांज्यावर काही ठिकाणी बंदी देखील आणली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देखील नायलाॅन माजांचा वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच दिलेत.