निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू!  मंत्री छगन भुजबळांची येवल्यात पतंगबाजी
निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू! मंत्री छगन भुजबळांची येवल्यात पतंगबाजी
img
Dipali Ghadwaje
येवला : मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित पतंग उत्सवात मंत्री भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल परदेशी यांच्या निवासस्थानी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच उपस्थित नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आकाशात झेपावणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहेत. हे पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत आपल्या समोर जे विरोधक असतील त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  

दरम्यान भुजबळ म्हणाले की, गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते. येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा दोर कापला आहे. येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे, त्यांनी विरोधात लढावं. मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी पंचायत समती सदस्य मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, गोटु मांजरे, सुमित थोरात, विशाल परदेशी, सचिन सोनवणे, गणेश गवळी आदी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group