मोठी बातमी : काठमांडू विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाच्या टायरला आग !
मोठी बातमी : काठमांडू विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाच्या टायरला आग !
img
दैनिक भ्रमर


काठमांडू : नेपाळ मध्ये त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली आहे. राजधानी काठमांडू येथील विमानतळावर लँडिगदरम्यान एका विमानाला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे विमातळावर मोठा गोंधळ उडाला होता. 

काठमांडू आंतरराष्ट्रीय विमातळाच्या सुरक्षा पोलिस अधीक्षक यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तुर्की एअरलाईन्सच विमान, फ्लाइट क्रमांक TK 726 इस्तंबूलहून नेपाळची राजधानी काठमांडूला आले होते.

परंतु लँडिगवेळी विमानाच्या टायरमधून धूर निघू लागला आणि अचानक पेटला. या घटनेची माहिती मिळताच विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाने तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. आगीवर नियंत्रण मिळवले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. या विमानात २८९ प्रवासी आणि ११ क्रू मेंबर्स होते.

घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अधिकारी आणि अग्निशमन दलाने बचाव कार्यासाठी धाव घेतली. आगीवर वेळेत नियंत्रत मिळवत विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात संयुक्त राष्ट्रांचे काही अधिकारीही उपस्थित होत. सर्व अधिकारी सुरक्षित आहेत.





इतर बातम्या
Join Whatsapp Group