हृदयद्रावक! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत
हृदयद्रावक! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत
img
दैनिक भ्रमर
निफाड प्रतिनिधी : निफाड येथील शेतकरी गोपाल जयराम ढेपले यांची मुले प्रेम गोपाल ढेपले व प्रतिक गोपाल ढेपले यांचा बुधवार दि २९ मे रोजी शेततळ्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वीजपंप सुरु करण्यासाठी शेतात गेलेले दोनही मुले घरी लवकर परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यास गेलॆल्या कुटुंबियांना दोनही मुले हे तळ्यातील पाण्यावर तरंगतांना दिसुन आले त्यांना तात्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता ते मृत असल्याचे डाँक्टरांनी सांगितले उपसजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिले जाणार आहेत. या घटनेने परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
death |
इतर बातम्या
Join Whatsapp Group