बुलेटच्या चाकात ओढणी  अडकल्याने महिलेचा मृत्यू
बुलेटच्या चाकात ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू
img
DB

वसई  :- पती-पत्नी देवदर्शनाहून घरी निघाले असताना चाकात ओढणी अडकून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्नीच्या निधनामुळे पतीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून पती-पत्नी आपल्या मनातली इच्छा घेऊन तुंगारेश्वर येथील महादेवाच्या दर्शनासाठी गेलेे होते.  देवदर्शन झाल्यावर दोघेही पून्हा घराच्या दिशेने निघाले होते.

पती आणि पत्नी दोघेही बुलेटवरुन घरी जात होते. यावेळी पत्नीची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने पत्नीला गळफास बसला आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पत्नीच्या डोक्याला जोरात मार लागल्यानेे तिचा जागीच मृत्यू झाला.

प्रतिमा यादव (वय 27, रा. इराणवाडी, कांदिवली पश्चिम) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. पत्नीचा जीव वाचावा म्हणून पतीने तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अपघातात पत्नीने पती समोरच जीव सोडला. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group