अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे भारतासह अनेक देशांना याचा फटका बसत आहे. मात्र यायचं ड्रमायन आता एक मोठी अपडेट समोर आली आहे वृत्तानुसार अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प याना मोठा धक्का दिल आहे.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं होतं. जो देश अमेरिकेच्या धोरणांविरोधात जाईल, त्या देशावर ते थेट 25 टक्के 35 टक्के 50 टक्के असा कितीही टक्के टॅरिफ लावायचे. अमेरिकेच्या या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेनं अनेक देशांची नाराजी ओढून घेतली, तसेच यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला देखील धक्का बसला, दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितीविरोधात अमेरिकेच्या कोर्टात दाद मागण्यात आली होती, या प्रकरणात ट्रम्प यांना कोर्टानं मोठा झटका दिला होता. अशापद्धतीने टॅरिफ लावणं हे अवैध असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.
त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्ध सुरू केलं. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं. दरम्यान त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केल्यानं ही सामुद्रधुनी व्यापारी जाहाजांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाची सध्या संपूर्ण जगाला फार मोठी किंमत मोजावी लागत असून, भारतासह जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मात्र आता अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.
अमेरिकेच्या न्यायालयाने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. गुरुवारी अमेरिकेच्या व्यापारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ज्यामध्ये राष्ट्रपतींकडून लावण्यात आलेलं 10 टक्के जागतिक आयात शुल्क अवैध असल्याचं म्हटलं आहे. तसेच न्यायालयाने हा 10 टक्के टॅरिफ देखील रद्द केला आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांना दिलेला हा दुसरा मोठा झटका आहे.
यासाठी न्यायालयाने 1970 च्या व्यापारी कायद्याचा संदर्भ दिला आहे. या कायद्यानुसार हा टॅरिफ अवैध ठरतो असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाने केवळ हा टॅरिफ अवैधच ठरवला नाहीये तर ज्यांच्याकडून टॅरिफ वसूल करण्यात आला होता, त्या सर्वांचे पैसे वापस देण्यात यावेत, पुढील पाच दिवसांमध्ये या आदेशाचे पालन करावे असं न्यायलयानं म्हटलं आहे.